निगडी येथील कोळी यांच्या घरी बाप्पा विराजमान
Pckhabar- निगडी, प्राधिकरण येथील
काळभैरवनाथ हौ. सोसायटी, sector
No.26, येथे वास्तव्यास असलेल्या संतोष कोळी यांच्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. कोळी यांच्या घरी गणपती बाप्पाच्या येण्याने आनंदाचे वातावरण आहे.
कोळी यांच्या घरी दगडूशेठ गणपती ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या गणपतीच्या भोवती आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. यामध्ये विविध फुलांचा समावेश आहे. या फुलांच्या भोवती विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईमध्ये बाप्पाची रूप अगदी खुलून दिसत आहे. ही सजावट संतोष कोळी यांनी केली असून त्यांना श्रेया आणि सान्वी यांनी सहकार्य केले आहे.
गणपतीच्या काळामध्ये घरामध्ये चैतन्याचे वातावरण असते. या काळामध्ये संपूर्ण कोळी परिवार एकत्र येऊन गणपती बाप्पाची मनोभावे आराधना करत असतात, असे शिल्पा कोळी यांनी pckhabar शी बोलताना सांगितले.
(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892















Leave a Reply