सातारा येथील संग्राम जंबुरे यांच्या घरी  घोड्यावर विराजमान झाले गणराज

सातारा येथील संग्राम जंबुरे यांच्या घरी  घोड्यावर विराजमान झाले गणराज

Pckhabar- सातारा जिल्ह्यातील विहे येथे वास्तव्यास असणारे संग्राम विष्णू जंबुरे आणि सौ. जयश्री संग्राम जंबुरे यांच्या घरी घोड्यावर विराजमान झालेल्या श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे.

जंबुरे यांच्या घरी गौराईची देखील प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गौराईला पारंपरिक पदार्थांचा नैवैद्य दाखविण्यात आला. गौराईला विविध प्रकारचे दागिने घालून नटविण्यात आले होते. गणपती बाप्पा भोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

जगावर आलेल्या कोरोना संकटातून लवकरात लवकर सर्वांची सुटका व्हावी, यासाठी संग्राम विष्णू जंबुरे, जयश्री संग्राम जंबुरे, त्यांची मुले विश्वजीत आणि सत्यजित यांनी बाप्पाकडे मनोभावे प्रार्थना केली.

(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *