संभाजीनगर येथील दत्तात्रय राऊत यांच्या घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा
Pckhabar- चिंचवड, संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे दत्तात्रय राऊत आणि लक्ष्मी दत्तात्रय राऊत यांच्या घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे.
राऊत यांच्या घरी गौराईची देखील प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गौराईला पारंपरिक पदार्थांचा नैवैद्य दाखविण्यात आला. गौराईला विविध प्रकारचे दागिने घालून नटविण्यात आले होते. गणपती बाप्पा भोवती आकर्षक फुलांची सजावट करत विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
गणेशोत्सवात राऊत कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असते. सर्व राऊत परिवारातील सदस्य एकत्र येतात. जगावर आलेल्या कोरोना संकटातून लवकरात लवकर सर्वांची सुटका व्हावी, यासाठी राजकुमार दत्तात्रय राऊत, सौ. तनुजा राजकुमार राऊत, पियुष राजकुमार राऊत यांनी बाप्पाकडे मनोभावे प्रार्थना केली.
(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892















Leave a Reply