महात्मा फुले पेठ येथील बाळकृष्ण भोसले यांच्या घरी बाप्पा विराजमान

महात्मा फुले पेठ येथील बाळकृष्ण भोसले यांच्या घरी बाप्पा विराजमान
Pckhabar- तुलसी अपार्टमेंट बी विंग, फ्लॅट नं. 9, 30-36महात्मा फुले पेठ पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या बाळकृष्ण मुक्ताजी भोसले यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मोठ्या उत्साहात भोसले कुटुंबीयांनी बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना केली.
गणपती बाप्पा भोवती आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. यामध्ये घरातील विविध वस्तूंचा वापर केला गेला आहे. या सजावटीमध्ये विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे. या फुलांच्या भोवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे. ही आरास अक्षय भोसले आणि प्रज्वल भोसले यांनी केली आहे.
गणपतीच्या काळामध्ये भोसले कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असते. संपूर्ण कुटुंबीयांकडून गणपती बाप्पाची मनोभावे आराधना केली जाते. जगावर आलेले कोरोना संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केल्याचे मनीषा भोसले यांनी pckhabar शी बोलताना सांगितले.

(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *