उन्न ”ती” च्या गणपतीचे विसर्जन
Pckhabar- : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने उन्न ‘ती ‘चा गणपती महोत्सव साजरा करण्यात आला. उन्नती सोशल फाउंडेशनने तुरटी पासून तयार केलेली गणेश मूर्ती बसवली होती. सातव्या दिवशी गणपतीची आरती कोरोना योद्धा महिला डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना संकटकाळात नियमांचे पालन करत उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयातील विसर्जन कुंडात फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे व महिलांच्या हस्ते गणेश विसर्जन करण्यात आले.
यावेळी फाउंडेशन चे संस्थापक श्री संजय भिसे, अतुल पाटील ,राजेंद्र जयस्वाल ,राजू देवतारे, डॉ ओंकार बाबेल, महिलांमध्ये अश्विनी भिसे, कविता भिसे, डॉ प्राजक्ता अरमरकर, मीनाक्षी देवतारे, शोभा राजगुरे , सुनीता जयस्वाल,किरंजित कौर उपस्थित होत्या.
कुंदा भिसे म्हणाल्या,सध्या कोरोनाच्या संकट काळात नियमांचे पालन करत गणेश मूर्ती घरीच विसर्जन करावे.















Leave a Reply