संगमनेर येथील परदेशी यांचा पर्यावरण पूरक बाप्पा
Pckhabar- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, चव्हाण पुरा, लक्ष्मण व्हिला येथे वास्तव्यास असणारे उदयसिंह लक्ष्मणसिंह परदेशी यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण पूरक अशा शाडू मातीच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते.
50 वर्षापूर्वी गणपतीची स्थापना माझ्या वडिलांनी म्हणजे लक्ष्मांसिंह यांनी केली होती. तशीच प्रथा आज माझा भाऊ उदयसिंह पुढे चलवत आहे. आमच्याकडे दहा दिवसांचा गणपती उत्सव साजरा केला जातो. गणपतीच्या पहिल्या दिवशी गणपतीचे आगमन विधिवत होते. त्यानंतर गणपतीची स्थापना करून 21 मोदकाचा नैवद्य दाखवला जातो.
सकाळ- संध्याकाळ आरती व गणपती स्त्रोत म्हटले जाते. आमच्याकडे पूर्वीपासूनच गणरायाची छोटी मूर्ती स्थापना करायची परंपरा आहे. त्यामागे माझ्या वडिलांचा हेतू म्हणजे नदी मध्ये पाण्याचे प्रदूषण होऊ नये. यासाठी आम्ही खास शाडू मातीपासून तयार केलेले गणेशाची मूर्ती पसंत करत होतो. दहाव्या दिवशी विधिवत पूजा करून संगमनेरच्या प्रवरा नादित विसर्जन केले जात होते. परंतु गेल्या काही वर्षापासून प्रवरच्या तीरावर पाण्याचे कुंड तयार केले जातात . निर्माल्याचे वेगळ्या कुंड असतात. त्यातच गणपतीचे विसर्जन केले जाते. आमच्याकडे वर्षभर गणपती देवाऱ्यात ठेऊन दररोज पुजा केली जाते.
जुन्या गणपतीचे विसर्जन केले जाते. व नवीन गणपती देव्हाऱ्यात विराजमान होत असे. मात्र, ती प्रथा कालांतराने ब्राम्हणाच्या सांगण्यावरून बंद केली आता. मात्र दहा दिवसांचाच गणपती असतो. यंदाच्या गणपतीचे खास वैशिष्टय म्हणजे पाण्याचे व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी घरीच मातीची मूर्ती माझ्या बहिणीने म्हणजे मनीषा लक्ष्मणसिंह परदेशी हिने स्वतःच्या हाताने तयार केली आहे. त्याचे पेंटिग व रंगकाम पण घरीच केले आहे. कोरोना खबरदारी म्हणून घरच्या टेरेसवरच गणपती विसर्जन करणार आहे. विघ्नहर्ता कोरोनाचे संकट लवकर दूर करो, अशी प्रार्थना परदेशी परिवाराने केली आहे.















Leave a Reply