देहुतील अनिता कुंभार यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराज विराजमान

देहुतील अनिता कुंभार यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराज विराजमान
Pckhabar- देहुगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या श्रीमती अनिता कुंभार यांच्या घरी गणेशाचे आगमन झाले आहे. कुंभार यांच्या घरी गणपतीसह गौराईचे देखील आगमन झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून कुंभार यांच्या घरी गौरी गणपती बसवला जातात.

या गौरी गणपती भोवती आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. या सजावटीमध्ये विविध आकर्षक अशा वस्तूंचा वापर करण्यात आला होता. यामध्ये विविध फुलांचा वापर करण्यात आला होता. या फुलांसोबतच विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती.

गौराईला विविध पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवण्यात आला होता. ही सजावट करण्यासाठी कुंभार यांचा मुलगा अक्षय कुंभार यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *