वक्तृत्व स्पर्धेत युसुफ, आयेशा, फरयान यांचा सहभाग

 

Pckhabar- हैदराबाद येथील ग्लोबल एज स्कूलच्या वतीने आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत पाचवीमध्ये शिकणारे युसुफ इम्तियाज नाईकवाडी याने ‘हिंदी भाषा का महत्त्व’, आयेशा इम्तियाज नाईकवाडी हिने’, हिंदी कवी इकबाल यांच्या विषयी माहिती’ तर फरयान इम्तियाज नाईकवाडी हिने ‘ग्लोबल वॉर्मिग’ या विषयावर उत्तम विचार मांडत सर्वांची मने जिंकली.

कोरोना या जागतिक महामारीमुळे देशात सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी देशभरातील शाळा विविध ऑनलाईन उपक्रम राबवत आहेत. याअंतर्गत ग्लोबल एज स्कूलने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.

युसुफ,आयेशा, फरयान यांना त्यांचे आजोबा ताजुद्दिन युसुफ नाईकवाडी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *