वडगावशेरी येथील मालन मोहिते यांच्या घरी गणपतीसह गौराईची प्रतिष्ठापना

वडगावशेरी येथील मालन मोहिते यांच्या घरी गणपतीसह गौराईची प्रतिष्ठापना

Pckhabar- वडगावशेरी येथे वास्तव्यास असणाऱ्या मालन मोहिते यांच्या घरी गणपतीसह गैराईची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मोहिते यांच्या घरी गेल्या चौदा वर्षांपासून गौरी आणि गणपतीचा सण साजरा केला जातो. त्यांच्या घरी अकरा दिवसांचा गणपती बसवला जातो.
गणपती सोबतच गौराईचे देखील थाटामाटात स्वागत केले जाते. या गौराईला विविध पदार्थ आणि फळांचा नैवेद्य दाखवला जातो. या गौरी आणि गणपती भोवती आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी विविध शोभेच्या वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. ही सजावट मनीषा मोहिते आणि वर्षा मोहिते यांनी केली आहे.

गौरी गणपतीच्या सणासाठी संपूर्ण मोहिते परिवार एकत्र येत असतात. यामध्ये गणेश मोहिते, प्रवीण मोहिते, अनिकेत मोहिते, शंतनु मोहिते, विराज मोहिते, संग्राम मोहिते यांचा समावेश असतो. मोहिते परिवाराकडून या अकरा दिवसांमध्ये गणपती बाप्पाची मनोभावे आराधना केली जाते.
दरम्यान जगावर आलेल्या कोरोना संकटातून लवकर मुक्तता व्हावी, अशी प्रार्थना मोहिते परिवाराने बाप्पाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *