जाधववाडी येथील पवन सोमवंशी यांच्या घरी पानांच्या सजावटीत बाप्पाची प्रतिष्ठापना

जाधववाडी येथील पवन सोमवंशी यांच्या घरी पानांच्या सजावटीत बाप्पाची प्रतिष्ठापना

Pckhabar- जाधववाडी येथे राहायला असणाऱ्या पवन सोमवंशी यांच्या घरी सुरेख अशी पानांची सजावट करून त्यामध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

ही पानांची सजावट वैशाली सोमवंशी यांनी केली आहे. वैशाली यांनी घरामध्येच कागदाचा वापर करून त्यांना पणाचा आकार दिला आहे. पानासोबतच त्यांनी फुलांचा देखील वापर सजावटीसाठी केला आहे. यामध्ये त्यांनी विविध रंगाचा वापर केला आहे.

या सजावटीमध्ये त्यांनी आकर्षक अशा विद्युत रोषणाई केली आहे. या गणपतीच्या दिवसांमध्ये पवन सोमवंशी आणि वैशाली सोमवंशी यांच्याकडून बाप्पाची मनोभावे आराधना केली जाते.

दरम्यान, जगावर आलेल्या कोरोना संकटातून लवकर मुक्तता व्हावी, अशी प्रार्थना सोमवंशी परिवाराने बाप्पाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *