दिपक आडकर व सौ.अश्विनी आडकर यांच्या घरी गौरींचे आगमन!

दिपक आडकर व सौ.अश्विनी आडकर यांच्या घरी गौरींचे आगमन!

Pckhabar- चिंचवड, सेक्टर सिद्धी होम्स येथील रहिवासी दिपक भगवान आडकर व सौ.अश्विनी दिपक आडकर यांच्या घरी गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे.

आडकर यांच्याकडे दरवर्षी गौरी -गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाच्या आगमनाने या उत्सवाला सुरुवात होते. त्यापाठोपाठ गौरी येतात आणि आनंदाला उधाण येते. आडकर यांच्याकडे दहा दिवसांचा गणपती असतो. गौरी गणपतींची आरास करायला दोघांनाही विशेष आवड आहे असे त्यांनी सांगितले. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घरीच शाडू मातीचा गणपती बनवला असुन , गौरींसाठीही त्यांनी ecofriendly आरास केली आहे. डेकोरेशनसाठी फुले, पेपर फ्लाॅवर्स तसेच फळे व फराळाचे विविध पदार्थ यांचा उपयोग करुन आरास केलेली आहे. सर्वांनी अशा प्रकारे सण -उत्सव साजरा करताना पर्यावरणाचेही भान ठेवले तर निसर्गाच्या कोपाला सामोरे जाण्याची वेळ मानवावर येणार नाही असे मत दिपक आडकर व सौ.अश्विनी आडकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *