भर दिवसा महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने हिसकावले

भर दिवसा महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने हिसकावले
Pckhabar- वडापावच्या गाडीवरून वडापाव पार्सल घेऊन निघालेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता तपोवन मंदिर रोडवरील गणेश मंदिराच्या शेजारी घडली.
याप्रकरणी कमल मदन गोयल (वय-53, रा. डेअरी फार्म रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमल गोयल तपोवन मंदिर रोडवर गणेश मंदिराच्या शेजारी असेलल्या वडापावच्या गाडीवरून वडापाव पार्सल घेऊन जात होत्या. वडापाव त्यांच्या मोपेड दुचाकीच्या डीक्कीमध्ये ठेवत असताना स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कमल यांच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे आणि हिर्‍याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *