योगी सरकारच्या दडपशाही विरोधात राष्ट्रपतींना भेटणार

योगी सरकारच्या दडपशाही विरोधात राष्ट्रपतींना भेटणार
Pckhabar- उत्तर प्रदेशात मागसवर्गीयांवर अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये 47 टक्के वाढ झाली आहे. या विरोधात लोकशाही पध्दतीने आवाज उठविणार्‍यांवर योगी सरकार दडपशाही करीत आहे. भाजप प्रणित सरकार असणार्‍या इतर राज्यांमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. या विषयी लवकरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंबोरे यांनी केली.
    उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील बासा गावचे सरपंच सत्यमेव जयते यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत गुरुवारी आझमगढ येथे गेले असता त्यांना उत्तर प्रदेश पोलीसांनी अटक केली. या हत्येच्या घटनेचा निषेध व उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या निषेध करण्यासाठी  शुक्रवारी दापोडी येथील हुतात्म सरदार भगतसिंह यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त शहराध्यक्ष अ‍ॅड. क्षितीज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी हिरामण खवळे, सौरभ शिंदे, तेजस पाटील, मयुर तिखे, सार्थक रानवडे, प्रथमेश कुंभार, अविनाश मेश्राम, संकेत कासुले, गंगाधर सुतार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *