नवी सांगवीतील  सत्ता प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात सेवा सप्ताह

नवी सांगवीतील  सत्ता प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात सेवा सप्ताह
प्रतिष्ठानचे संस्थापक सौरभ शिंदे यांची माहिती

Pckhabar- नवी सांगवीतील सत्ता प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षापासून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित आहे.यावर्षी कोरोना महामारीमुळे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भव्यदिव्य मिरवणूक व प्रतिष्ठापना न करता साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला .सातही दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक सौरभ शिंदे यांनी सांगितले.

सात दिवसामध्ये  विशेष प्राविण्य घेतलेले 10 व 12 वी तील प्रत्येकी पाच विद्यार्थी, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, कोराना योद्धांचा सन्मान, अंःध,अपंगांना मदत , महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छता करण्याऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान, संविधानाचे वाटप, तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मडळाने  (राज्य शासनाने) महाराष्ट्रातून निवडलेल्या आणि पिंपरी चिंचवड शहरातील पाच गुणवंताचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यामध्ये शंकर नानेकर, महीद्रा सी.आय ई, शिवराम गवस, मार्शल कंपनी, संगिता जोगदंड, धर्मवीर बँक, मुल्ला इस्माईल व दत्तात्रय अवसकर, दोघे ही टाटा मोटर यांना ही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. परंतु हे सर्व शासनाने दिलेल्या सर्व निकष पाळुन “सेवा सप्ताह “करणार असल्याचे संस्थापक सौरभ शिंदे व अध्यक्ष अमित जगदाळे, बंटी मापारे, अर्णव कामटे, अविनाश मेश्राम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *