आकुर्डीत फास्टट्रॅकचे शोरूम फोडले

आकुर्डीत फास्टट्रॅकचे शोरूम फोडले
Pckhabar- बंद शोरूमचे शटर उचकटून आत प्रवेश करून चोरटयाने शोरूममधील 1 लाख 40 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना आकुर्डी स्टेशन येथील जिवन फास्टट्रॅक येथे बुधवारी रात्री घडली.

मेधा उमेश गोखले (वय-47, रा. ओंकार कुंज अपार्टमेंट, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोखले यांचे आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील एबीसी टियारा बिल्डींगमध्ये जीवन फास्टट्रॅकचे शोरूम आहे. अंगात रेनकोट, हातात ग्लोज घातलेल्या अज्ञात चोरट्याने बुधवारी रात्री त्यांच्या शोरूमचे शटर उचकटून आत प्रवेश केला. ड्रॉवरमध्ये ठेवलेले 1 लाख 40 हजारांची रोकड चोरून नेले. हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *