चाकुचा धाक दाखवून तरूणाला लुटले

चाकुचा धाक दाखवून तरूणाला लुटले
Pckhabar- चाकूचा धाक दाखवून एका तरूणाला दोघांनी त्याच्याकडील लॅपटॉप आणि रोकड असा 12 हजारांचा ऐवज लुटून नेला. हा प्रकार देहूरोड येथे घडला.

आलोक समरबहादुर सिंग (वय-35, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे आलोक सिंग हे सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास गहुंजेकडून देहूरोडकडे जाणार्‍या रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सिंग यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील 12 हजारांचा लॅपटॉप, 400 रूपयांची रोकड असा 12 हजार 400 रूपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. फौजदार कुदळे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *