Talegaon Dabhade News : यशवंतनगरमधील झाडांवर आकर्षक नक्षीकाम; नगरसेवक निखिल भगत यांची संकल्पना

Talegaon Dabhade News : यशवंतनगरमधील झाडांवर आकर्षक नक्षीकाम; नगरसेवक निखिल भगत यांची संकल्पना

Pckhabar- वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने तळेगाव स्टेशन भागातील यशवंतनगरमधील अंतर्गत सार्वजनिक रस्त्याकडेच्या झाडांच्या बुंध्यांवर आकर्षक रंगकाम करून नक्षीचा साज चढविला आहे. ही संकल्पना नगरसेवक निखिल भगत यांनी राबविली आहे.

तळेगाव दाभाडे शहराला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. शहरात आणि परिसरात हिरवीगार वनराई नागरिकांना सुखावणारी आहे.

यशवंतनगर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने लावलेली झाडे चांगलीच मोठी होऊन बहरली आहेत. यात शोभेच्या झाडांबरोबरच विविध देशी, औषधी आणि फळझाडांचाही समावेश आहे. वसंतात नव्याने पालवी फुटत जाणारी ही झाडे आल्हाददायक गारवा देऊन जातात. आता याच झाडांवर सेंद्रिय रंग वापरून रंगीबेरंगी नियोजन आहे. स्थानिक नगरसेवक निखिल भगत यांनी स्वखर्चातून सुशोभीकरणाची ही मोहीम राबवली आहे.

याबाबत नगरसेवक निखिल भगत म्हणाले ” नक्षीकाम केल्याने यशवंतनगरमधील अंतर्गत रस्त्यांवर आणखी मनोहारी दृश्य अनुभवायला मिळत आहे. पावणेदोनशे झाडांचे सुशोभीकरण करण्यात आले असून, आणखी शंभर झाडांना सुशोभीकरण करण्याचे नियोजन आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *