बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम बाप गजाआड
Pckhabar- घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीला तुला आणि आईला औषध टाकून मारतो, अशी धमकी देत बापानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केला. नात्याला काळीमा फासणारी ही घटना चिखली येथे नुकतीच घडली.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 37 वर्षीय आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पिडीत मुलीचा बाप आहेत. घरात कोणी नसताना आरोपी मुलीवर अत्याचार करत होता. याची माहिती कोणाला सांगितल्यास तुला आणि आईला औषध टाकून मारतो, अशी धमकी देत वारंवार अत्याचार केला. या प्रकाराची मुलीच्या आईला माहिती झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.















Leave a Reply