Pune News : प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वडिलांना सामाजिक उपक्रमांनी श्रध्दांजली
मूकबधिर शाळा, वृद्धाश्रमाला आर्थिक मदत ; स्व. राजेश नंदलाल जैस्वाल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जैस्वाल कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम

Pckhabar- गतवर्षी 2021 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपले आप्त गमावले. त्यातच मुळचे नांदेड निवासी असणारे निवृत चीफ मँनेजर श्री राजेश नंदलाल जी जैस्वाल (रा. श्री जगद्गुरु सोसाइटी लोहगाव पुणे) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे प्रथम पुण्यस्मरण 23 एप्रिल 2022 रोजी पार पडले. स्व. राजेश नंदलाल जैस्वाल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जैस्वाल कुटुंबाने मूकबधिर शाळा, वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करून वडिलांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली.

कुटुंबियांनी मुक बधिर शाळेला तसेच ईश्वर पुरम संस्थेला गरजे प्रमाणे देणगी व धान्य देऊन मदत केली.
स्वर्गीय राजेश नंदलाल जी जैस्वाल यांना जाणणाऱ्या आप्तांचा एक मेळावा त्यांच्या घरी बोलावण्यात आला. स्व. जैस्वाल साहेबांबरोबर काम करताना, जगताना आलेले अनुभव प्रत्येकाने मांडले. कार्यक्रमाला येऊ न शकलेल्या अश्या नातेवाईक ,मित्र गण यांच्या कडून whatsapp मेसेजस, व्हिडिओ इत्यादी मागवण्यात आले व त्याचे वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाला त्यांचे जीवलग मित्र श्री बसवंत घेवारे , निवृत्त बैंक अधिकारी व पत्नी जयश्री घेवारे नांदेड येथून आले होते. स्व. राजेश जैस्वाल साहेबानी संपूर्ण देह दानाचा संकल्प केला होता. कोरोना मुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. तथापि माझ्या मृत्युच्या तिसऱ्या दिवसानंतर कुठलेही कर्म कांड करायचे नाही असा त्यांचा विचार होता. तो विचार पाळत कुटुंबियानी पुण्य स्मरण दिवशी कुठलेही कर्मकांड केले नाही.
यावेळी मनोगत व्यक्त करताना घेवारे साहेब म्हणाले, संपूर्ण बँकेतील कारकिर्दित त्यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. या उलट निवृतीनंतर देखील बँकेला सेवा दिली. तसेच इनिस्पेक्षन काळात अनेक भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी बसवले. परंतु कधीही वैर अथवा अहंकार केला नाही.
देशमुख साहेब म्हणाले की, आयुष्यात मी कधी असा पुण्यस्मरण कार्यक्रम पाहिला नाही. स्व जैस्वाल साहेबांनी अनेक सामाजिक कामे केली त्यातून आम्हा नवीन पीढिला आदर्श मिळाला, आपल्या रागावर ताबा प्राप्त करणे काकांकडून शिकलो, होळंबे साहेब म्हणाले.
देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव म्हणाले की, आजच्या या जगात दोन भाऊ एकत्र राहतात हेच काकांचे संस्कार दाखवते.
अश्या प्रकारचा कार्यक्रम घेण्याचा जैस्वाल परिवाराचा उद्देश पुढीलप्रमाणे –
1. वडिलांच्या पुण्य स्मरण दिवशी दुःख न करता त्यांच्या प्रेरणादायी आठवणीना उजाळा देणे.
2. डैडीन्च्या जाण्यानंतर त्यांचे मित्र परिवार वडिल धारी माणसे यांच्याशी नाते संबंध टिकवून ठेवणे आणि आपण वडिल धाऱ्यांकड़े दुर्लक्ष केले आहे आपण त्यांचे देणे लागतो याची जाणीव स्वतः व प्रत्येक उपस्थिताला करून देणे.
3. वडिलांच्या सामाजिक कार्याची कुटुंबिय व आप्त लोकांना जाण राहील आणि तसे वागण्याची प्रेरणा मिळेल.
4. गरजु तसेच मुक बधिर मुलांना कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत मदत करून समाजा प्रतीचे आपले कर्तव्य पूर्ण करणे
5. आई वडिल जो पर्यंत हयात आहेत तेंव्हाच त्यांची सेवा करावी. ही भावना नव पीढि मधे उत्पन्न करणे.
6. सोसायटी मधील तेढ, गट बाजी संपवने.
आपल्या कार्यक्रमात आम्ही जवळ पास वरील सर्वच उद्दिष्ठ पूर्ण केले असे डॉ उमेश जैस्वाल म्हणाले.















Leave a Reply