बनावट पॅनकार्डच्या आधारे क्रेडीट कार्ड घेऊन पाच लाखांचा गंडा

बनावट पॅनकार्डच्या आधारे क्रेडीट कार्ड घेऊन पाच लाखांचा गंडा
Pckhabar- दुसर्‍याच्या नावे बनावट पॅनकार्ड तयार करून त्याचा वापर करून क्रेडीट कार्ड घेतले. त्या क्रेडीट कार्डचा वापर करून तब्बल पाच लाख रुपयांची खरेदी करून एकाला गंडा घातला. हा प्रकार सप्टेंबर 2019 पासून 6 डिसेंबर 2019 या कालावधीत घडला.

याप्रकरणी लोकेशकुमार महेशकुमार डिमोले (वय-40, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादी लोकेशकुमार यांच्या नावाने बनावट पॅनकार्ड तयार केले. त्याचा वापर करून आरोपीने स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडीट कार्ड घेतले. या कार्डचा वापर करून आरोपीने पाच लाख रुपयांची खरेदी केली. खरेदी केल्यानंतर क्रेडीट कार्डची सर्व बिले लोकेशकुमार यांच्या नावाने येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यामुळे घाबरलेल्या लोकेशकुमार यांनी त्वरीत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *