माजी विद्यार्थ्याकडून शाळेला सॅनिटायझर स्टँड भेट

माजी विद्यार्थ्याकडून शाळेला सॅनिटायझर स्टँड भेट
Pckhabar- दारूंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलचे माजी विद्यार्थी मयूर संजय वाघोले यांनी हायस्कूलला सॅनिटायझर स्टँड भेट म्हणून दिले आहे.

याप्रसंगी मुख्याध्यापक नारायण पवार, सुरेश वाघोले, बाळू भोंडवे, सूर्यकांत सोर्टे, दळवी सर, त्रिंबक कांबळे, वाघमारे यांनी हे सॅनिटायझर स्टँड स्विकारले.

कोरोनामुळे सर्वांना आपल्या हाताची स्वच्छता राखणे महत्वाचेे आहे. त्यासाठी हात वारंवार सॅनिटाईज करणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून हायस्कूलचे माजी विद्यार्थी मयूर वाघोले यांनी सॅनिटायझर स्टँड भेट दिले आहे, त्याबद्दल त्यांचे मुख्याध्यापक नारायण पवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *