Pimpri news : आज 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू , 704 नवीन रुग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील 23 जणांचा आज (सोमवारी) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहराच्या विविध भागातील 681 आणि पालिका हद्दीबाहेरील 23 अशा 704 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 36 हजार 78 झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 79 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये भोसरी (स्त्री 62 वर्षे), वाकड (स्त्री 67 वर्षे), चिंचवड (स्त्री 65 वर्षे, पुरुष 59 वर्षे, पुरुष 55 वर्षे, पुरुष 72 वर्षे, पुरुष 60 वर्षे ),
पिंपरी (स्त्री 83 वर्षे, स्त्री 80 वर्षे), निगडी (स्त्री 65 वर्षे), आकुर्डी (पुरुष 53 वर्षे), दिघी (स्त्री 39 वर्षे), कासारवाडी (स्त्री 80 वर्षे), किवळे (पुरुष 66 वर्षे), मोशी (पुरुष 85 वर्षे, पुरुष 78 वर्षे), दापोडी (स्त्री 74 वर्षे, पुरुष 49 वर्षे), च-होली (पुरुष 95 वर्षे), निगडी (पुरुष 62 वर्षे), थेरगाव (पुरुष 73 वर्षे), जुनी सांगवी (पुरुष 74 वर्षे), पिंपळेगुरव (स्त्री 60 वर्षे) दरम्यान, राज्य सरकारच्या कोविड 19 पोर्टलनुसार 15 पिंपरी- चिंचवड पालिका हद्दीतीली रहिवाशांचे पूर्वी झालेले मृत्यू हे पालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात झाल्याची नोंद घेतल्याने प्रगतीपर अहवाल मृत्यू संख्येचा आकडा 662 झाला असल्याचे पालिकेने सांगितले आहे.
शहरात आजपर्यंत 36 हजार 78 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 25 हजार 60 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 662 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 127 अशा 789 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3372 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.















Leave a Reply