महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे स्वतंत्र दिन शहिदांना आदरांजली वाहून साजरा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे स्वतंत्र दिन शहिदांना आदरांजली वाहून साजरा
Pckhabar- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे स्वतंत्र दिन शहिदांना आदरांजली वाहून साजरा करण्यात आला.

नगरसेवक सागर अंघोळकर यांनी नागरिकांनी कोरोना या महामारीला न घाबरता धैर्याने तोंड द्यावे ,पुढच्या वर्षी आपला देश कोरोना मुक्त वातावरणात स्वतंत्र दिन साजरे करेल असा विश्वास व्यक्त केला. मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती चे शहराध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी शहिद झालेल्या सैनिकांची शौर्य गाथेची माहीती देऊन देशभक्ती जाग्रती  केली. देशभक्ती च्या गीतांनी परीसर देशभक्तीमय झाला होता.

साहित्य सर्वधन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी पर्यावरण पुरक रांगोळी काढून ,पर्यावरणाचे रक्षण करण्याचे नागरिकांना आव्हान केले. नगरसेवक सागर आंघोळकर व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पिंपळे गुरवच्या वतीने केंद्र संचालक प्रदिप बोरसे यांच्या हस्ते, गुणवंत कामगार, आण्णा जोगदंड, सूरेश कंक, प्रकाश घोरपडे, कवी शरद शेजवळ याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिशू मंदिर, शिक्षिका प्रतिभा मरडकेंद्र संचालक प्रदिप बोरसे, पवन पवार, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *