Chinchwad News : स्पर्धात्मक युगात गुणवत्तेला महत्त्व : जगदीश जाधव

Chinchwad News : स्पर्धात्मक युगात गुणवत्तेला महत्त्व : जगदीश जाधव
Pckhabar- चिंचवड स्टेशन येथील विकास शिक्षण मंडळाचे श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय इयत्ता पाचवी ते आठवी च्या शासकीय परीक्षा मंडळ महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा सन 2021_2022 या वर्षी विद्यालयाची कु.वैष्णवी जाधव, तनिष्क चंद्राते, ओम बाराहाते, व साहिल टावरे यांनी गुणवत्ता यादीत यश संपादन केले. तसेच तज्ञ मार्गदर्शक संध्या दरंदले, अनुजा खाडे, सुरेखा मोरे, मेधा रोटे, वृषाली जाधव, सुजाता बेडेकर व शामकांत ब्राह्मणकर आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री जगदीश जाधव, विजय जाधव ,माध्यमिक मुख्याध्यापक श्री बाळाराम पाटील ,पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, प्राथमिक मुख्याध्यापक श्री साहेबराव देवरे, व उपमुख्याध्यापक बाळू महाजन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शरद पटेल, किसन आहिरे, लीला मुटकुळे व छायाचित्रकारअनिल मुंढे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जगदीश जाधव म्हणाले की,” शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष दिले गेले पाहिजे, सध्या स्पर्धात्मक युग असल्याने गुणवत्तेला महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय भालेराव यांनी केले, तर आभार श्री बाळू महाजन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *