विक्रीसाठी आणलेला 20 किलो गांजा जप्त; एकाला अटक

विक्रीसाठी आणलेला 20 किलो गांजा जप्त; एकाला अटक
  Pckhabar- वाल्हेकरवाडी येथून एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 10 लाख 15 हजार 605 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 20 किलो 595 ग्राम वजनाचा गांजा आणि एका कारचा समावेश आहे.

अल्लाबक्ष नजीर शेख (वय 26, रा. सारोळा रोड, ता. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शाकीर गौस मोहद्दिन जिनेडी यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाला बुधवारी दुपारी माहिती मिळाली की, वाल्हेकरवाडीमधील लक्ष्मीनगर येथे एक तरुण गांजा विक्रीसाठी आला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लाऊन आरोपी शेखला कारसह ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 5 लाख 14 हजार 875 रुपये किमतीचा 20 किलो 595 ग्राम वजनाचा गांजा सापडला. पोलिसांनी गांजा आणि कार असा एकूण 10 लाख 15 हजार 605 रुपयांचा ऐवज जप्त करत आरोपी शेख याला अटक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *