Bhosari News : मानवसेवा हीच ईश्वर सेवा : प्रा अशोक कुमार पगारिया

Bhosari News : मानवसेवा हीच ईश्वर सेवा : प्रा अशोक कुमार पगारिया

Pckhabar- रोटरी क्लब आँफ डायनॅमिक भोसरी आणि रोटरी क्लबऑफ राजगुरु नगर आणि  मुंबई  माता बाल संगोपन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, नारायण सेवा संस्थान, उदयपूर  यांच्या सहकार्याने दिव्यांग मोफत तपासणी व कृत्रिम हात, पाय आणि कँलीपर्स मापन शिबिर येथील दि. ९ जानेवारी रोजी  राजगुरुनगर येथील मुंबई  माता बाल संगोपन केंद्र अर्थात सेंटर हाँस्पिटल येथे घेण्यात आले.

या शिबिराचे उद्द्घाटन रोटरी क्लब भोसरीचे अध्यक्ष डाॅ अशोककुमार पगारिया ,रोटरी क्लब राजगुरुनगरचे अध्यक्ष रो.अजित वाळुंज, नारायण सेवा संस्थान चे व्यवस्थापक मुकेश शर्मा,व
सेंटर हाँस्पिटल व्यवस्थापिका शर्मिला सांडभोर यांच्या हस्ते व  इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या वेळी बोलताना बोलताना श्री. मुकेश शर्मा म्हणाले “नारायण सेवा संस्थानच्या वतीने दिव्यांगाच्या उपचार ,शस्रक्रिया मोफत कृत्रिम हात,पाय रोपन याशिवाय अनाथ
संगोपन केंद्र, मोफत भोजन, मोफत अरोग्य सुविधा हे ही उपक्रम राबविले जातात.ते
जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या भावनेतुनच ही सेवा केली जाते. “श्री. अजित वाळुंज यांनी रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली व क्लबच्या लवकरच केमोथेरपी सेंटर व डायलिसिस सेंटर उभारण्याचा मानस व्यक्त केला. , डॉ. अशोक कुमार पगारिया यांनी प्रतिपादन केले की  दुःखीत्तांचे दुःख, पिडीतांची पिडा कमी करण्याचे भाग्य सर्वांच्या नशिबाला मिळत नाही.रोटरी क्लबच्या मानव सेवेच्या दिव्यांग सेवा यासारख्या अनेक उपक्रमातुन रोटरीयन सभासदांना  हे भाग्य मिळाले आहे.पोलिओ ,डायलेसिस,ग्रामसेवा,शिक्षण अशा अनेक क्षेत्रात रोटरीचे कार्य परिचित आहे असे प्रतिपादन केले. नारायण सेवा संस्थानचे  समाजसेवेच्या क्षेत्रात अत्यंत मोठे कार्य आहे. श्री .कैलास मानव  यांना भारत सरकारने या कार्या बद्दल पद्मश्री कीताब किताब देउन सन्मान केला आहे.  ”           या वेळी रोटरीच्या वतीने नारायण सेवा संस्थानचे श्री.मुकेश शर्मा,डाॅ विजय कार्तिकेय,डाँ.मेहता,व सर्व स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला तसेच नारायण सेवा संस्थानच्या वतीने तिनही संस्थांच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात आला यावेळी राजगुरुनगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.विजय भन्साळी,प्रदिप कासवा,सुशिल शिंगवी,संतोष बोथरा,प्रकाश गदीया,तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी – सचिव जितेंद्र गुजराथी,डाँ.दिलिप बांबळे,पवन कासवा ,अविनाश कोहीणकर,गणेश घुमटकर,अविनाश कहाणे,सुधीर येवले,श्याम खळदकर, संतोष पडवळ,राहुल वाळुंज, विठ्ठल सांडभोर, प्रवीण वाईकर, सर्व ऍन्स-रोट्रॅक्टर व भोसरी क्लबचे सचिव रामदास जैद,प्रा.सदाशिव कांबळे,निलेश जैन,अँड.पी.एम.जैन,सौ.कविता शेठीया,विलास पगारीया,नियाज शेख,प्रा.सचीन पवार,प्रा.भैसाणे,शांताराम जाधव,दिपक सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दिव्यांग तपासणी आणि कृत्रिम हात ,पाय आणि कॅलीपर मापन शिबिरात  – ६० दिव्यांग तपासणी , ४२ हात ,पाय मापन, ७ सर्जरी केसेस   निश्चित झाल्या.विशेषतः बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, नाशिक मालेगाव येथून दिव्यांग उपस्थित झाले होते,. सुधीर  मांदळे यांनी सूत्रसंचालन, प्रस्तावना रो गणेश घुमटकर व आभार रो अविनाश कोहिणकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *