Chinchwad News: पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली

Chinchwad News: पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली

Pckhabar- चिंचवड स्टेशन येथील विकास शिक्षण मंडळाचे श्रीमती सी के गोयल विद्यालयात पद्मश्री व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री जगदीश जाधव ,विजय जाधव,प्राथमिक मुख्याध्यापक श्री साहेबराव देवरे व उपमुख्याध्यापक श्री बाळू महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री जगदीश जाधव म्हणाले,” की परमेश्वर देखील आव्हानांना सामोरे जाणारी खास माणसं जन्मास घालतो.” व आपले काम त्यांच्याकडून घडवुन घेतो, त्यातील एक अनाथांची माय, महाराष्ट्राची माई, हजारहून नातवंडांची आजी, निराधारांची माय माऊली सिंधुताई सपकाळ यांचं जाणं मनाला वेदना देऊन गेलं. ही समाज हानी न भरून येणारी फार मोठी आहे .माय तुला सलाम!

याप्रसंगी माध्यमिक मुख्याध्यापक श्री बाळाराम पाटील ,पर्यवेक्षक श्री दत्तात्रय भालेराव, अनिल मुंढे व शरद पटेल आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाळू महाजन यांनी केले तर आभार श्री अनिल मुटकुळे यांनी मानले.