खान्देश मराठा मंडळातर्फे सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा सत्कार

खान्देश मराठा मंडळातर्फे सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा सत्कार
Pckhabar- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा खान्देश मराठा मंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठा खांदेश मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष मधुकर पगार, खजिनदार भास्कर पाटील, प्रांत पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष गोपाल बिरारी आदी उपस्थित होते.
दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटील हे तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील आबा यांचे बंधू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खान्देश मराठा मंडळ हे आयसोलेशन वार्ड विनामोबदला राहण्यासाठी उपलब्ध करून दिले.
आजवर झालेल्या सर्व अध्यक्षांच्या कारकीर्दीमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यात नव्हे तर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या परिसरातील खानदेश मराठा मंडळाने नावलौकिक मिळवलेला आहे. मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *