
Chikhali News : घरकुलमध्ये मोफत आरोग्य शिबिर
Pckhabar- घरकुलमध्ये प्रयास संस्था, आस फाऊंडेशन व आयरीम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे स्तन कॅन्सर व गर्भाशय मुख कॅन्सर बाबत मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
यात तपासणी व उपचार या दोन्ही गोष्टी करण्यात आल्या. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर हे हजर होते. यामध्ये डाॅ.तृप्ती धरपवार व डाॅ.सिमा कंद यांनी महिलांना कॅन्सर बाबत मार्गदर्शन केले व त्यांची मोफत आरोग्य तपासनी करून घेतली.
यामध्ये 47 महिलांची तपासणी करण्यात आली. कल्पना कवडी, सुरेखा मिसाळ यांनी आयोजन केले. या शिबिरास संतोष माळी, विकासराजे केदारी यांनी सहकार्य केले.















Leave a Reply