Sangvi News : माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

 

Pckhabar-माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी  साजरा करण्यात आला.

पिंपळे गुरव नवी सांगवीतील कै गणपतराव जगताप प्रतिष्ठान च्या अंतर्गत असणाऱ्या सर्व महिला बचत गटातील सदस्य,ज्येष्ठ नागरिक,रिक्षा चालक, टेम्पो चालक तसेच या परिसरातील युवा कार्यकर्त्यांना भेट म्हणून एक हातातील घड्याळ, मिठाई बॉक्स, मनशक्ती प्रार्थना पुस्तक तसेच सुंगंधी अगरबती देण्यात आली.

मा राजेंद्र जगताप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी एक लाख एकावन्न हजार रुपयाचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे उपमख्यमंत्री मा अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

मातोश्री रुग्णालय पिंपळे गुरव च्या डॉक्टर अबोली कदम यांच्या वतीने मा राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात आले यामध्ये साधारण 110 नागरिकांची करण्यात आली. मा राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी सांगवी सांगवी पिंपळे गुरव परिसरातील ज्येष्ठ नागरिक,युवा कार्यकर्ता मा बबलू भाऊ चकाले सह त्यांच्या 300 युवा कार्यकर्ते,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 29 महिला अध्यक्षा संजीवनी पुराणिक सह 10 महिला कार्यकर्त्या, विविध क्षेत्रातील मान्यवर व त्यांचे सहकारी साधारण 400 ते 500 कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मा संजोग वाघेरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला.याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी महापौर शकुंतला धराडे,अखिल वारकरी पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष मा विजय आण्णा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष मा प्रशांत शितोळे ,माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे ,श्याम जगताप, आदियाल, तानाजी जवळकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष मा अरुण पवार,मा नगरसेवक राजू लोखंडे, हुसेन मुलानी,शिवाजी पडुळे, अभिषेक जगताप ,बाळासाहेब पिल्लेवार, पंकज मालविया,संदीप राठोड अर्जुन शिंदे,गणेश जगताप, रावसाहेब तुपे उपस्थित होते.
अभिष्टचिंतन सोहळ्यास मा राहुल कलाटे,पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी शिक्षण मंडळ सभापती चेतन भुजबळ, माजी नगरसेविका रमाताई ओव्हाळ,विद्यमान नगरसेविका सौ स्वाती उर्फ माई काटे, युवा नेते शेखर काटे, पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा टोणपे साहेब,परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर ,महिला भगिनी , युवा कार्यकर्ते यांनी मा राजेंद्र जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.