Pimpri News : नवमहाराष्ट्र विद्यालयात ऑनलाइन शिक्षक दिन संपन्न

Pimpri News : नवमहाराष्ट्र विद्यालयात ऑनलाइन शिक्षक दिन संपन्न

Pckhabar-5 सप्टेंबरचे औचित्य साधून नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज, पिंपरी , येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने केले गेले. यामध्ये इयत्ता पाचवीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा देऊन नरेंद्र मोदी शिक्षकांसाठी राबविणार असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच श्रेयश सूर्यवंशी या विद्यार्थ्याने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला तर ओमकार चव्हाण, संकेत तुरुकमारे, वेदांत जाधव ,शिवाजी बधाले यांनी इंग्रजी व मराठी मधून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती दिली.

या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षकांसाठी ऑनलाइन ( क्विज कॉम्पिटिशनचे ) प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिक्षक दिन तसेच सामान्य ज्ञान व चित्रातील व्यक्ती ओळखा यावर आधारित प्रश्न होते, या स्पर्धेत गीतांजली शिंदे या प्रथम आल्या तसेच इतर सर्व शिक्षकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला

यावेळी उपमुख्याध्यापक पी. एम. शेख यांनी मनोगत व्यक्त केले पर्यवेक्षिका शुभांगी गमे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन निता शेटे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक शरद परदेशी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *