Sangvi Crime news: बेकायदेशीर सावकारी करणार्या दोघांवर गुन्हा
Pckhabar-कर्जाचे व्याज थकल्याच्या कारणामुळे बेकायदेशीर सावकारी करणार्या दोघांनी राहते घर 500 रूपयांच्या खरेदी पावतीने स्वतःच्या नावावर करून घेतले. तसेच वेळोवेळी 10 लाख 39 हजार रूपये घेऊनही आणखी पैशांसाठी महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत बेकायदेशीर सावकारी करणार्या दोघांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धोंडीबा काशीनाथ जाधव (रा. राजगुरूनगर), अविनाश बाबुराव अवसारे (रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने आरोपींकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे व्याज थकल्याने फिर्यादी यांच्या पतीकडून आरोपींनी त्यों राहते घर 500 रूपयांच्या खरेदी पावतीने स्वतःच्या नावावर करून घेतले. तसेच फिर्यादी यांचे पती मिसिंग होईपर्यंत आरोपी अवसारे याला 8 लाख 50 हजार तर जाधवला 1 लाख 89 हजार असे वेळोवेळी 10 लाख 39 हजार रूपये दिले आहेत. आणखी पैशांसाठी महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक गवारी तपास करत आहेत.















Leave a Reply