Pimpri Crime News : पत्नीच्या कपाळावर मारली दारूची बाटली
Pckhabar- पत्नीकडे पैसे मागत शिवीगाळ आणि मारहाण करून पत्नीच्या कपाळावर दारूची बाटली मारणार्या पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मारूजी येथे घडला आहे.
पुनितकुमार विवेक शेट्टी (वय-30, रा. मारूजी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पत्नीकडे पैसे मागत होता. पैसे न दिल्यामुळे आरोपीने शिवीगाळ, मारहाण करून मानसिक आणि शारिरीक छळ केला. तसेच त्यांच्या कपाळावर दारूची बाटली मारून त्यांना पायरीवर आपटले. यामध्ये महिलेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
Pimpri Crime News : पत्नीच्या कपाळावर मारली दारूची बाटली















Leave a Reply