‘आरपीआय’च्या वतीने  अण्णा भाऊ साठे  यांना अभिवादन

‘आरपीआय’च्या वतीने  अण्णा भाऊ साठे  यांना अभिवादन
Pckhabar- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित ‘आरपीआय’च्यावतीने  भोसरी येथे वृक्षारोपण आणि लहान  मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तत्पूर्वी साठे यांच्या प्रतिमेला विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून  अभिवादन केले.

आरपीआयचे  प्रभाग अध्यक्ष  अक्षय दुनघव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  लांडेवाडी भोसरी येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला.  या वेळी आरपीआय अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष खाजाभाई शेख यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर परिसरात   लहान मुलांना वही वाटप व खाऊ  वाटप करण्यात आले. तसेच परिसरात वृक्षारोपण  करण्यात आले.

भोसरी एमआयडीसीचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील व आरपीआयचे (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्रचे सचिव बाळासाहेब भागवत,  आरपीआय  युवक आघाडीचे  शहराध्यक्ष  कुणाल व्हावळकर, विलास गरड, बाळासाहेब गवळी, संजय जाधव, नितिन गाडेकर, सागर दुनघव, प्रविण चोळसे, विजय पवार, प्रशांत दुनघव, अण्णा भाऊ साठे जयंतीचे अध्यक्ष आशा पवार, जयंतीचे उपाध्यक्ष रेखा जाधव, मनिषा सर्वगोड, काचंन दुनघव, छबू गायकवाड, मंगल थोरात, बंटी जाधव, रेखा थोरात, छाया शिंदे, आशा शिंदे, स्मिता धिवार, संगिता पाटील, वर्षा जाधव, रेश्मा थोरात, रन्ना थोरात आदी  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *