Pimpri Crime News : पतीला घटस्फोट दे अन् माझ्याबरोबर लग्न कर असे म्हणत महिलेचा विनयभंग

Pimpri Crime News : पतीला घटस्फोट दे अन् माझ्याबरोबर लग्न कर असे म्हणत महिलेचा विनयभंग
Pckhabar-मुलीला क्लासला सोडण्यासाठी गेलेल्या महिलेच्या कारवर तरूणाने थाप मारून कार थांबवत गाडीची चावी काढून घेतली. ’तु माझ्याबरोबर विवार करणार आहे, तु तुझ्या पतीला घटस्फोट दे, पतीला घटस्फोट दिला नाही तर तुला व पतीला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आला.
या प्रकरणी महिलने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहन दिपक रेवाळे (वय 24, रा. खराळवाडी पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या मुलीला क्लासला घेऊन निघाल्या होत्या. त्या अजमेरा फ्युजन पार्क समोर आल्या असत्या आरोपीने पाठीमागून येऊन गाडीवर थाप मारून गाडी थांबविली. फिर्यादी यांनी काच खाली घेतली असता आरोपीने गाडीची चावी काढून घेतली. त्यानंर फिर्यादी यांचा हात पकडून तु माझ्या बरोबर लग्न करणार आहे, तुझ्या पतीला घटस्फोट दे. तु जर पतीला घटस्फोट दिला नाही तर तुला व तुझ्या पतीला मारून टाकील, अशी धमकी देत अश्लिल बोलणे केले. तसेच फिर्यादी यांच्या केसावरून आणि चेहर्‍यावरून हात फिरवत विनयभंग केला. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *