Sangvi Crime News : सहाय्यक पोलिस निरीक्षकावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

Sangvi Crime News : सहाय्यक पोलिस निरीक्षकावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
Pckhabar-पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन तुला नांदायला घरी घेऊन जातो, असे खोटे सांगून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी सातारा ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षकावर पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 28 फेब्रुवारी 2021 ते 15 जून 2021 या कालावधीमध्ये शिवम बिल्डिंग, ओंकार कॉलनी, पिंपळे गुरव येथे घडली.

शिवाजी बबन भोसले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सध्या तो सातारा ग्रामीण पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथे कार्यरत आहे. याबाबत पीडित महिलेने  सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी महिलेसोबत गंधर्व पद्धतीने विवाह केला. पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन फिर्यादी यांना नांदायला घरी घेऊन न जाता पहिल्या बायकोपासून घटस्फोट घेतल्यानंतर तुला नांदायला घेऊन जातो, असे वारंवार खोटे बोलून फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यांना शिवीगाळ करून बदनाम करण्याची धमकी दिली. तसेच त्यांना वारंवार हाताने मारहाण केली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *