Alandi Crime News : रिक्षा चालकांकडून पैसे लुबाडणारे दोन तोतया पोलीस ताब्यात
Pckhabar- खाकी गणवेश घालून रिक्षा चालकांकडून पैसे लुबाडणार्या दोन तोतयांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास आळंदी-चाकण घाटातील रस्त्यावर उघडकीस आला.
महिंद्र पांडुरंग झोंबाडे (वय 35, रा. चाकण, आगरकरवाडी) व चंद्रकांत वामन कांबळे (वय 36, रा. चाकण, खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मच्छिंद्र पोपट भांबरे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आळंदी-चाकण घाटातील रस्त्यावर पोलिसांसारखा खाकी गणवेश घालून रिक्षा चालकांना थांबवत होते. त्यांची कागदपत्रे तपासणी करत होते. तुमच्यावर कारवाई करतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेत होते. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.















Leave a Reply