Pimpri Crime News : पोलिसाच्या डोक्यात हाणले दांडके, दोघांना अटक
Pckhabar- विनामास्क फिरणार्या व्यक्तीवर कारवाई करणार्या पोलिसाला शिवीगाळ करून त्याच्या कपाळावर दांडके मारत पावती पुस्तक हिसकावून घेतले. तसेच नोकरी घालवण्याचीही धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार पिंपरीतील, मोरवाडी येथे शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला.
रामदास सोपान लुकर (वय 65, रा. लालटोपी नगर, मोरवाडी, पिंपरी) व सतीश पवार (वय 40, रा. लालटोपी नगर, मोरवाडी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई पंडित लक्ष्मणराव धुळगंडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई मोरवाडी याठिकाणी विनामास्क फिरणार्या नागरिकांवर कारवाई करत होते. यावेळी विनामास्क फिरणार्या आरोपींवर कारवाई करत असताना आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पावती पुस्तक हिसकावून घेत नोकरी घालवण्याची धमकी दिली. आरोपींना चौकशीसाठी पोलीस चौकीत घेऊन जाताना आरोपी सतीश पवार हा पळून गेला. आरोपी रामदास याने लाकडी दांडके फिर्यादी यांच्या कपाळावर मारले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Pimpri Crime News : पोलिसाच्या डोक्यात हाणले दांडके, दोघांना अटक















Leave a Reply