Nigdi Crime News : मौज-मजेसाठी दुचाकी चोरणार्या दोघांना अटक
3 लाखांच्या 10 दुचाकी जप्त
Pckhabar-मौज-मजेसाठी दुचाकी चोरणार्या दोन सराईत चोरट्यांना निगडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 3 लाखांच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. निगडी पोलिसांनी ही कारवाई ट्रान्सपोर्टनगर येथे केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रफीक मोहंमद रशीद अली शेख (वय-20 रा. काळभोरनगर, पिंपरी), निरज अजय शर्मा (वय-18 रा. नारायण काळभोर चाळ, काळभोरनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
निगडी परिसरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असून निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी चोरट्यांच्या मागावर होते. दुचाकी चोरणारे सराईत गुन्हेगार रफीक आणि निरज हे ट्रान्सपोर्टनगर येथील रायगड हॉटेल जवळ थांबले असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस नाईक राहुल मिसाळ यांना मिळाली. त्यांच्याकडे असलेली लाल रंगाची मोपेड चोरीची असल्याचे समजले.
पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. शहरातील विविध भागात मौज-मजेसाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींनी 10 दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी 7 गुन्हे उघडकीस आणून 3 लाख 2 हजार किमतीच्या 10 दुचाकी जप्त केल्या.















Leave a Reply