भोसरीत सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून सव्वा दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी
Pckhabar- बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सव्वा दोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना दिघी रोड येथील राधानगरी हाऊसिंग सोसायटी येथे घडली.
याप्रकरणी कमल दिगंबर धोत्रे (वय 60, रा. राधानगरी हाऊसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धोत्रे यांचे घर दि. 20 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत कुलूप लावून बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरचा सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उघडून 14 तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या, 11 ग्रॅमचे सोन्याचे बुगडी, कुडके, अंगठ्या, कानातील टोप्स आणि साडेचार तोळ्यांचे चांदीचे पैंजण असा एकूण दोन लाख 26 हजार 800 रुपयांचे दागिने चोरून नेले.
फिर्यादी धोत्रे या आजारी असल्याने त्या रुग्णालयात दाखल होत्या. उपचार घेतल्यानंतर रुग्णालयातून घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
भोसरीत सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून सव्वा दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी















Leave a Reply