लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार
Pckhabar- भाजी खरेदी करण्यासाठी जाता-येता झालेल्या ओळखीतून एकाने महिलेला लग्नाचे अमिष दाखविले. महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करून त्यानंतर लग्नाला नकार दिला. हा प्रकार चिखली येथे नुकताच घडला.
याप्रकरणी पिडीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष दगडू राक्षे (वय-40, रा. घरकुल, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भाजी आणण्यासाठी जाताना आरोपी राक्षे याच्याबरोबर ओळख झाली. आरोपीने त्यांना लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे म्हणून लग्नाला नकार दिला. यामुळे घाबरलेल्या फिर्यादी यांनी चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरूध्द तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मस्के अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *