Crime News : सांगवी, तळेगावातून दोन मुलींचे अपहरण

Crime News : सांगवी, तळेगावातून दोन मुलींचे अपहरण
Pckhabar-सांगवीत शाळेची पुस्तके मैत्रिणीला देण्यास गेलेल्या आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अशा दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी तळेगाव आणि सांगवी पोलीस ठाण्याच अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवीतील घटनेप्रकरणी मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांची 16 वर्षीय मुलगी गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता मैत्रीणीस शाळेची पुस्तके देऊन येते, असे सांगून घराबाहेर गेली. मात्र, ती परत न आल्यामुळे तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

दुसर्‍या घटनेप्रकरणी मुलीच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  त्यानुसार 17 वर्षीय मुलीचे अपहरण करणार्‍या अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी यांची मुलगी 6 जुलै रोजी रात्री पावणे आठ पासून कातवी येथून गायब झाली आहे.  तळेगाव एमआयडीसी आणि सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *