Chikhali Crime News : जिवे ठार मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार; होणाऱ्या पतीच्या भावाला फोटो पाठविले
Pckhabar- मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे गोड बोलून तरूणाने शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र, याला विरोध केल्यानंतर तरूणाने महिलेला हाताने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, असे म्हणत जबरदस्तीने बलात्कार केला. महिलेच्या होणार्या पतीच्या भावाला व्हॉटसअॅपवर त्यांचे दोघांचे फोटो पाठवून तुझे लग्न होऊ देणार नसल्याची धमकी दिली. हा प्रकार 2019 ते 2021 या कालावधीत चिखली येथे घडला.
अमोल प्रकाश डबडे (वय-29, रा. महातपुरी, परभणी) याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांच्या घरी जावून मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे बोलून शरीर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. पिडीत महिलेने याला विरोध केल्यानंतर आरोपीने महिलेला हाताने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देत माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, असे म्हणत जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच आरोपीने 27 जून 2021 रोजी महिलेच्या होणार्या पतीच्या भावाला व्हॉटसअॅपवर त्यांचे दोघांचे फोटो पाठवून तुझे लग्न होऊ देणार नसल्याची धमकी दिली.
चिखली पोलीस तपास करत आहेत.















Leave a Reply