Bhosari Crime News : मुलाचा मित्र असल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेचे सोन्याचे गंठन लांबविले

Bhosari Crime News : मुलाचा मित्र असल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेचे सोन्याचे गंठन लांबविले
Pckhabar-’मी तुमच्या मुलाचा मित्र असून मी भाजी वाल्याचा मुलगा आहे. आम्ही दोघे एकाच ताटात जेवलो आहोत, मला तुमच्या गळ्यातील गंठण सारखेच गंठण माझ्या आईला करायचे आहे.’ असे म्हणून ज्येष्ठ महिलेचे गंठण पाहण्यास घेऊन दोघांनी 70 हजार रूपयांचे गंठण लांबविले. हा प्रकार भोसरीतील बालाजी किराणा दुकानात मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.
सुलोचना चंद्रकांत हांडे (वय-65, रा. भारत माता चौक, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी फिर्यादी या त्यांच्या दुकानात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोलखी आरोपींनी फिर्यादी यांना ’मी तुमच्या मुलाचा मित्र असून मी भाजी वाल्याचा मुलगा आहे. आम्ही दोघे एकाच ताटात जेवलो आहोत, मला तुमच्या गळ्यातील गंठण सारखेच गंठण माझ्या आईला करायचे आहे.’ असे सांगून त्यांच्याकडील  गंठण पाहण्यास घेतले. हातचलाखी करून दोघांनी 70 हजार  600 रूपयांचे गंठण चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *