Moshi News : धोकादायक डीपी बॉक्स बदला, अन्यथा आंदोलन
राजु भुजबळ यांचा इशारा
Pckhabar-चिखली- प्रभाग क्र 2 जाधववाडी कुदळवाडी मधील अनेक ठिकाणी विद्युत डीपी बॉक्स खराब झाले आहेत. येत्या महिनाभरात
धोकादायक डीपी बॉक्स बदलेले नाही तर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे कार्यकर्ते राजु भुजबळ यांनी महावितरण मोशी चिखली कार्यालयास दिला आहे.
काही ठिकाणी बॉक्स वाकले आहे काही ठिकाणी बॉक्स गंजलेले आहे अनेक ठिकाणी डीपी बॉक्स ची झाकणे गायब आहेत. यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शकता आहे. या ठिकाणी लहान मुले खेळत असतात नागरिकांची वर्दळ असते त्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे
धोकादायक डीपी बॉक्स बदलण्याची मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात महावितरण अधिकारी रमेश सूळ यांना तक्रार केली आहे. तसेच महावितरण कर्मचारी यांना पण वारंवार माहिती दिली आहे.















Leave a Reply