Akurdi Crime News : बदनामी केल्यामुळे तरूणाची आत्महत्या, चौघांवर गुन्हा

Akurdi Crime News : बदनामी केल्यामुळे तरूणाची आत्महत्या, चौघांवर गुन्हा
Pckhabar-बदनामी केल्यामुळे होणार्‍या त्रासाला कंटाळून एका तरूणाने चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आकुर्ड़ी येथे उघडकीस आली आहे. चिठ्ठीत नावे लिहिलेल्या चौघांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित रमेश गोसावी (वय-28, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल रमेश वसंत गोसावी (वय-50) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संगमेश्वर गंगाधर येवते (वय-32, रा. खंडोबा माळ चौक, आकुर्डी), भोनुप्रसाद हंसराज जैस्वाल (वय-29, रा. पांढारकरनगर, आकुर्डी), विश्वजीत मधुकर मेढे (वय-30), आकाश घाडगे  ( दोघे रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित याची आरोपींनी बदनामी केली होती. या बदनामीला आणि त्रासाला कंटाळून त्याने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊऩ आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी अमितने आरोपींची नावे चिठ्ठी लिहिली आहे. त्यानुसार त्यांच्यावर आत्महत्येस प्रर्वत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *