Pimpri Crime News : विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार, जिवे मारण्याची धमकी, 9 जणांवर गुन्हा

Pimpri Crime News : विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार, जिवे मारण्याची धमकी, 9 जणांवर गुन्हा
Pckhabar- विवाहितेला माहेराहून घर आणि व्यावसायासाठी पैसे घेऊन येण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी शारिरीक आणि मानसिक छळ केला. तसेच पतीने त्यांच्या अनैसर्गिक अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पिंपरीतील विठ्ठलनगर येथे घडला.
याप्रकरणी पिडीत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पतीसह सासरच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेराहून घर आणि व्यावसायासाठी फिर्यादी यांना 50 हजार रूपये आणण्याची मागणी करत आरोपींनी वारंवार शारिरीक आणि मानसिक त्रास देत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या पतीने वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *