Bhosari Crime News : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर ब्लेडने वार
Pckhabar- चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला शिवीगाळ करत ब्लेडने वार करणार्या पतीवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजता आळंदी रोड येथे घडली.
अर्जुन राजाराम ठोसरे (वय-43, रा. आळंदी रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्या विविध कारणावरून वाद होत आहेत. आरोपी त्यांच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असून याच कारणावरून त्याने ब्लेडने त्यांच्या उजव्या हाताच्या पोटरीवर वार करून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
Bhosari Crime News : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर ब्लेडने वार















Leave a Reply