Chinchwad Crime News : दारू पिण्यासाठी पैसे मागत दुकानदार दाम्पत्याला लाथाबुक्यांनी मारहाण

Chinchwad Crime News : दारू पिण्यासाठी पैसे मागत दुकानदार दाम्पत्याला लाथाबुक्यांनी मारहाण

दहशत माजविणार्‍या चौघांवर गुन्हा
Pckhabar- कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन दुकानात घुसलेल्या चौघांनी आम्हाला दारू पिण्यासाठी दोनशे रूपये दे, असे म्हणत दुकानदाराने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी काऊंटरची काच फोडली. दुकानदार पती-पत्नीला लाथाबुक्यांनी मारहाण करून कोयते हवेत फिरवून दहशत पसरविली. ही घटना चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी येथे घडली.
स्पप्न्या उर्फ स्वप्निल माडेकर, सुरज उर्फ सस्या वाघमारे, राजे माडेकर, साहिल मेहंदळ (चौघेही रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आनंदनगरमध्ये माताजी सुपर मार्केट नावाने दुकान आहे. त्या आणि त्यांचे पती दुकानात असताना आरोपी कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन दुकानात घुसले. दारू पिण्यासाठी दोनशे रूपयांची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे चिडलेल्या आरोपींनी दुकानाच्या काचेच्या काऊंटरवर कोयते मारून काच फोडली. गल्यातील पैसे जबरदस्तीने घेत असताना फिर्यादी व त्यांची पतीने विरोध केल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्या मदतीसाठी आलेल्या लोकांना आरोपींनी कोयते दाखवून दहशत माजविली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *