Chinchwad news: सुरक्षा रक्षकाच्या वाढदिवसानिमित्त  सभासदांची आर्थिक मदत

Chinchwad news: सुरक्षा रक्षकाच्या वाढदिवसानिमित्त  सभासदांची आर्थिक मदत
Pckhabar- वाल्हेकरवाडी येथील सप्तर्षी सी विंग या गृहरचना संस्थेने कोरोना जागतिक महामारीचे भय लोकांमध्ये पसरले आहे. परिवारातील नात्यांमध्ये असणारे बंधनाचे धागे कमकुवत होत असताना आपल्या संस्थेतील सुरक्षा रक्षक नामदेव घेरडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन संस्थेच्या प्रत्येक सभासदाने सढळ हाताने मदत करून रोख रक्कम त्यांना देण्यात आली.

संस्थेचे चेअरमन अतुल भालेराव म्हणाले, ” की जे  सुरक्षा रक्षक रात्र दिवस आमच्या परिवाराची बिल्डींगची अविरत सुरक्षा करतात त्यांच्यासाठी कृतज्ञ असायला हवे. आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना जागृत होते. या प्रसंगी संस्थेचे  रोहन पवार, पंकज कमलकर, तुषार मिरगल आदी सभासद उपस्थित होते.

नामदेव घेरडे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले,” की मी अपंग असुन मला सप्तर्षीं संस्थेने कोरोना काळात लॉकडाउन च्या परिस्थितीत माझ्या घर खर्चासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी जी मदत केली ती मी कधीच विसरू शकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *